Friday, March 31, 2023
No menu items!
HomeराजकारणMpsc च्या परीक्षेचा फेरविचार करावा- नरेंद्र पाटील

Mpsc च्या परीक्षेचा फेरविचार करावा- नरेंद्र पाटील

राज्यात कोरोनाचा कहर चालू असताना एमपीएससी परीक्षा घेत आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलले आहेत.

लॉकडाऊन मुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, नाशिक, नांदेड, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे बरेच विद्यार्थी आहेत. पुण्या मध्ये राहून mpsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेचे सेंटर पुणे व आसपासच्या परिसरात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही पुण्यातच राहून तयारी करत आहेत. यातच वैभव शितोळे आणि प्रतीक कांबळे या mpsc च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला .या मुळे भीतीचं खूप मोठं वातावरण निर्माण झाले आहे.अनेक अभ्यासिकेतील विद्यार्थी आजारी असतानाही मेडिकलच्या गोळ्यांवर दिवस काढत आहेत….!! जर परीक्षा घेतलीच तर खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एमपीएससीच्या परीक्षा संदर्भात फेरविचार करण्यासाठी ट्विटरद्वारे विनंती केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular