सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबलं आहे. सध्या चालू असलेल्या भरतीमध्येही प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडून आपली तिजोरी भरत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीकडून आज पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले वाड्यात आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ही यावेळी आपली भूमिका मांडली. यावेळी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसोबतच, आमदार रोहित दादा पवार, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची राज्य कार्यकारणी, अध्यक्ष – राहुल कवठेकर, सचिव – निलेश गायकवाड, कार्याध्यक्ष – महेश घरबुडे, सहसचिव – सुरेश सावळे, सहसचिव – रमेश पाटील, सदस्य – नितीन आंधळे आणि इतर अनेक पदाधिकारी एकदिवसीय उपोषणाला बसले आहेत.
mpsc uposhan | पुण्यात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि आ. रोहित पवार यांचे उपोषण सुरू
आज आम्ही सर्व युवा, विदयार्थी हे आंदोलन आराजकीरीत्या करत आहोत. हे उपोषण प्राथमिक स्तरावर आहे. आंदोलनाचं हे ठिकाणही मुलांनी निवडलं आहे. हे ठिकाण प्रेरणा देणारं आहे. इथंच शिक्षणाच्या संदेश दिला गेला. सामान्य लोकांच्या बाजूने त्यांनी लढा उभारला. तिथंच आम्ही हे आंदोलन करत आहोत. उपोषण करताना आमच्या तीन मागण्या आहेत. ही सगळी मुलं सिरीयस आहेत. घरात गणपती असताना सर्व आले आहेत. तरी कंत्राटी भरतीच्या विरोधात आमचं आंदोलनं सुरु आहे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
Kolhapur: कोल्हापुरात गौतमी पाटीलला नो एन्ट्री
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
कंत्राटी भरती, स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी, सरळसेवेतील परीक्षा शुल्क, पेपरफुटी कायदा आणि MPSC मधील अनेक मागण्यांसाठी आज सर्व विद्यार्थांनी मिळून उपोषण आयोजित केलं आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि इतर अनेक व्यक्ती संघटना मिळून उपोषणाला बसले आहेत. mpsc andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. यासाठी पेपरफुटीवर कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. mpsc andolan