Saturday, July 27, 2024

mpsc protest pune । विद्यार्थ्यांची मागणी योग्यच -रोहित पवार

- Advertisement -

mpsc protest pune आज सकाळपासून शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू -स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा

UPSC च्या धर्तीवर MPSC च्या नवीन परीक्षा पद्धतीला विरोध नाही पण त्यासाठी विद्यार्थांना पुरेसा वेळ मिळणंही गरजेचं आहे. त्यामुळे नवी वर्णनात्मक परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी योग्यच आहे. शासनाने याबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे. pune mpsc Protest

विद्यार्थ्यांना MPSC आयोगाकडून अपेक्षित असणाऱ्या सुधारणा कोणत्या ते पहा

  • Descriptive Pattern लागू करण्यापूर्वी पुरेसा वेळ दिला गेला आहे का याची पुनर्पडताळणी करून विद्यार्थ्यांना न्याय देणे . ही पद्धत 2025 पासून लागू करण्याची शिफारस होती ; याबद्दल गांभीर्याने विचार करणे . mpsc protest pune
  • सर्व परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करतेवेळीच त्या सर्वसमावेशक असाव्यात ; जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करावे लागू नये , यासाठी राज्यसरकारशी / सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधून प्रक्रिया राबविणे .
  • सर्व परिक्षांच्या Final answer key साठी पुरेसा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांची समिती नेमली गेली पाहिजे ; जेणेकरून कमी वेळेत योग्य उत्तरांसाहित final answer key येऊन निकाल वेळेत लागेल तसेच विद्यार्थी जास्त काळ संभ्रमावस्थेत राहणार नाहीत
  • पहिल्या key मधील योग्य उत्तरे बदलून दुसऱ्या key मध्ये चुकीची उत्तरे दिली ; यात चूक कुणाची ? ज्या प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरे आहेत ते किमान रद्द तरी व्हायला हवे होते ; कोर्टात सुद्धा cases टिकत नाहीत , विद्यार्थ्यांनी कुणाकडे न्याय मागावा ?

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles