कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या दारात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याची आगळीवेगळी रणनीती स्वीकारली आहे. भाजपच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये मोफत शासकीय सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.



या कॅम्पमध्ये आधार कार्ड अपडेट, नवीन पॅन कार्ड, डिजिटल आधार, रेशन कार्ड, मतदार नोंदणी, उत्पन्न व रहिवाशी दाखले यांसारख्या महत्त्वाच्या सेवा पूर्णत: मोफत दिल्या जात आहेत. आतापर्यंत १०,००० हून अधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतल्याची माहिती भाजपा कार्यालयातून दिली आहे.
विशेष बाब म्हणजे, या कॅम्पमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना संबंधित सेवा थेट त्यांच्या घरी ‘डिजिटल स्वरूपात’ पोहोचवल्या जात आहेत. भाजपच्या या मायक्रो लेव्हल प्लॅनिंगमुळे इच्छुक उमेदवारांना स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
ही सेवा मोहीम पुढील एक महिनाभर सुरू राहणार असून, भाजपने या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही रणनीती भाजपच्या विजयाची नांदी ठरू शकते, असा राजकीय वर्तुळात कयास लावला जात आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेतून व जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या संकल्पनेतून तसेच खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन केले जात आहे.





भाजपच्या या अभिनव उपक्रमामुळे इतर पक्षांतील कार्यकर्तेही अशाच प्रकारचे कॅम्प राबवण्याची मागणी करत असून, त्यामुळे विरोधकांवर दबाव वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून महेश जाधव यांना जबाबदारी
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. मा. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. गेली एक महिना त्यानी संपूर्ण जिल्हयाचा दौरा करून इच्छुक उमेदवारांच्या गाटीभेटी घेतल्या आहेत.”
एकूणच, भाजपने महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून महापौर पद भाजपकडे आणण्याचे ध्येय यामागे आहे. ही रणनीती विरोधकांसाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक ठरत आहे, आणि त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.
