मोठी बातमी : MPSC राजपत्रित व अराजपत्रित पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवली

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025) आणि महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२४ (Maharashtra Non-Gazetted Group ‘B’ and Group ‘C’ Services Combined Examination 2024) मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वर्षाची अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. | MPSC Age Limit Extension

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेचा निर्णय

भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी सरकारने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारांकडून यासंदर्भात निवेदने आली होती. त्यानंतर सरकारने सकारात्मक विचार करून अराजपत्रित गट ‘ब’ मधील पीएसआय आणि इतर काही परीक्षांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. | MPSC Age Limit Extension

गट ‘ब’ व गट ‘क’ परीक्षांसाठी विशेष निर्णय

सध्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२४ अशा तीन महत्त्वाच्या परीक्षांपैकी गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होती. सरकारकडे आलेल्या निवेदनांचा विचार करून काही पदांसाठी वयोमर्यादा एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांसाठी मोठा दिलासा

या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार असून, राज्य सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

👉 MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. | MPSC Age Limit Extension

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com