मुंबई, दि. 23 : किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग’ व ‘अभियांत्रिकी उद्योग’ या उद्योगांच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २१ नोव्हेंबर २०२२ ते 31 डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता तसेच २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा’ या उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने अधिसूचनेतील तरतुदीनुसार २३ नोव्हेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीकरिता ९ डिसेंबर २०२२ रोजी विशेष भत्ता दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे, असे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा” या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.
परिमंडळ १ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६२०/- + ८५८/- = १७,४७८/-
२) अर्ध कुशल कामगार : १५,१५०/- + ८५८/- = १६,००८/-
३) अकुशल कामगार : १४,०९५/- + ८५८/- = १४,९५३/-
परिमंडळ २ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १५,७८०/- + ८५८/- = १६,६३८/-
२) अर्ध कुशल कामगार : १४,३१०/- + ८५८/- = १५,१६८/-
३) अकुशल कामगार : १३,२५५/- + ८५८/- = १४,११३/-
औषधी द्रव्य व औषध बनविणारा उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने या अधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरता पुढीलप्रमाणे आहे.
परिमंडळ १ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,६०५/- + ३७२/- = १६,९७७/-
२) अर्ध कुशल कामगार : १५,१८५/- + ३७२/- = १५,५५७/-
३) अकुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-
परिमंडळ २ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम(प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,०००/- + ३७२/- = १६,३७२/-
२) अर्ध कुशल कामगार : १४,५८०/- + ३७२/- = १४,९५२/-
३) अकुशल कामगार : १३,५६५/- + ३७२/- = १३,९३७/-
परिमंडळ ३ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना) = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १५,५९०/- + ३७२/- = १५,९६२/-
२) अर्ध कुशल कामगार : १४,१७०/- + ३७२/- = १४,५४२/-
३) अकुशल कामगार : १३,१५५/- + ३७२/- = १३,५२७/-
अभियांत्रिकी उद्योग’ या अनुसूचित उद्योगाच्या मूळ किमान वेतन दराचे पुनर्निर्धारण झाल्याने याअधिसूचनेतील तरतुदीनुसार विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता पुढीलप्रमाणे आहे.
परिमंडळ १ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता (प्रती महिना) रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,४५०/- + ३७२/- = १६,८२२/-
२) अर्ध कुशल कामगार : १५,०२५/- + ३७२/- = १५,३९७/-
३) अकुशल कामगार : १४,०१०/- + ३७२/- = १४,३८२/-
परिमंडळ २ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम (प्रती महिना)= एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १६,०४५/- + ३७२/- = १६,४१७/-
२) अर्ध कुशल कामगार : १४,६२०/- + ३७२/- = १४,९९२/-
३) अकुशल कामगार : १३,६०५/- + ३७२/- = १३,९७७/-
परिमंडळ ३ करिता : किमान मूळ वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १५,२२५/- + ३७२/- = १५,५९७/-
२) अर्ध कुशल कामगार : १३,८०५/- + ३७२/- = १४,१७७/-
३) अकुशल कामगार : १२,७९५/- + ३७२/- = १३,१६७/-
- पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
- Apara Ekadashi Vrat Katha 2025: यहां पढ़ें पूरी व्रत कथा, शुभ योग और पूजा विधि
- A Historic Collapse: How Aaron Nesmith and the Pacers Stunned the New York Knicks in Game 1
- 2025 Tata Altroz Launch: Bookings Open 2 June | Price Starts ₹6.89 Lakh
- Vivo Y300 GT Launched with 7620mAh Battery & Dimensity 8400 | Full Specs & Price