….अन्यथा तलाठीभरती परीक्षा रद्द करण्यास लावणार | talathi bharti

- Advertisement -

तलाठी पदभरतीमध्ये talathi bharti डमी टोळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे मिळाली आहे. याबाबत महसूल विभागाला आधीच सूचित करण्यात आले आहे. फक्त TCS ION परीक्षा केंद्र असावेत ही मागणी मान्य झालेली नाही. महसूल विभागाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.

Talathi Bharti 2023 Apply Online | new Syllabus

अनेक उमेदवार आम्हाला सल्ले देत असतात की परीक्षेअगोदर विभागाला गैरप्रकाराबद्दल सूचित का केले जात नाही? तर प्रत्येक वेळी आम्ही आधी त्या विभागाशी संपर्क साधतो पण त्यांच्याकडून या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात नाही त्यामुळे आम्ही सोशल आणि टीव्ही मीडियाद्वारे घोटाळे उघडकीस आनावे लागतात आणि त्या विभागाला दखल घेण्यास भाग पाडले जाते. talathi bharti

तलाठी हे पद अत्यंत महत्त्वाचे असून आताची तलाठी पदभरती जाहिरात कदाचित शेवटची असेल, यानंतर इतकी मोठी जाहिरात येईल किंवा नाही याबद्दल शास्वती नाही. यावेळी परीक्षेदरम्यान यदाकदाचित पेपर फुटून आमच्या पर्यंत आलाच तर ती शिफ्ट सरसकट रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येईल. कारण तपासात १००% गुन्हेगार सापडण्याची शक्यता कमी असते व फुटलेला पेपर कोणा-कोनापर्यंत पोचला हे सांगणे कठीण असते. एकही जागी घोटाळेबाज नोकरीला लागल्यास तो प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय असेल. talathi bharti

Barti मार्फत MPSC परीक्षेसाठी निशुल्क प्रशिक्षण | ‘येथे’ अर्ज करा

या सर्व गोष्टी आधीच आपल्या सर्वांसमोर ठेवणे आमचे कर्तव्य आहे. महसूल विभागाला आमची विनंती असेल आम्ही दिलेल्या SOP गांभीर्याने घ्याव्या. तर डमी टोळीला इशारा आहे, तुमच्या पैकी एकालाही नोकरीवर लागू देणार नाही, प्रत्येक घोटाळेबाजाच्या हातात बेड्या लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. talathi bharti

तलाठी पदभरती गैर प्रकाराबाबत आपल्यापैकी कोणाला काहीही माहिती असल्यास आपण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला या 8668378583 क्रमांकावर थेट संपर्क करू शकता. कॉल उचलला गेला नाहीच तर आपली माहिती व्हॉट्सॲप मेसेजद्वारे लिहून पाठवावी. असे आवाहन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आता पर्यंत आरोग्य भरती, म्हाडा, TET(शिक्षक भरती), मुंबई पोलीस भरती तसेच इतर अनेक परीक्षा मधील घोटाळे बाहेर काढले आहेत. आता पर्यंत कलेक्टर, आयुक्त, सचिव यांना अटक करण्यात आले आहे. त्यामुळे महसूल विभागाने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या इशाऱ्याला गांभीर्याने घावे. कोणत्या ही विद्यार्थ्याने कोणाच्या भूलथापाला बळी न पडता अभ्यास करून पोस्ट घ्यावी. मुंबई पोलीस भरती मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles