TCS Jobs देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये करोडो रूपयांचा नोकरी घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या बातमीनुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठं कमिशन घेतले आहे.
हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती TCS च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप (TCS Job Scandal) व्हिसलब्लोअरने केला आहे.
talathi bharti – तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट
ईएस चक्रवर्ती १९९७ पासून TCS मध्ये कार्यरत होते. ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन गणपती सुब्रमण्यम यांना रिपोर्ट करत होते. रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे कार्यकारी अरुण जीके यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांशिवाय ज्या अधिकाऱ्यांवर टीसीएसने कारवाई केली, त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. तसेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. TCS Jobs
….अन्यथा तलाठीभरती परीक्षा रद्द करण्यास लावणार | talathi bharti
एका व्हिसलब्लोअरने कंपनीच्या सीईओ आणि सीओओला पत्र लिहून आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती उमेदवारांना नियुक्ती देताना स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत आहेत, असा दावा केला. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली गेली. आणि चौकशीनंतर टीसीएसने आपल्या भरती प्रमुखांना रजेवर पाठवले आणि चार आरएमजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. गेल्या 3 वर्षांत टीसीएसनं कंत्राटी भरतीसह 3 लाख लोकांना कामावर घेतले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, ह्या प्रकरणी टीसीएसकडून घोटाळा झालाच नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.
१०० कोटींच्या घोटाळ्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, टीसीएसमध्ये नोकरी मिळवण्याच्या बदल्यात हा भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात झाला हे सांगता येणं सध्या कठीण आहे, परंतु असे मानले जाते की, यातील लोकांनी किमान १०० कोटी रुपये कमिशन घेतले आहेत. खरं तर RMG विभाग दररोज नवीन भरतीसह सुमारे १४०० अभियंत्यांना विविध प्रकल्पांवर नियुक्त करतो. याचा अर्थ TCS चा RMG विभाग दर मिनिटाला नवीन प्लेसमेंट करतो, यावरूनच घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे बोलले जात आहे.
द मिंटच्या वृत्तानुसार, टीसीएसने लोकांना नोकऱ्या देण्याऐवजी पैसे घेतले आहेत. आतापर्यंत तुम्ही तुमच्या सरकारी नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याबद्दल ऐकले असेल. मात्र आता खासगी नोकरीसाठी हा घोटाळा झाला आहे. जिथे कंपनीने लोकांना नोकरी देण्यासाठी इतर नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेतले आहेत. हा छोटासा वसा नसून 100 कोटींचा घोटाळा आहे. तथापि, livejanmat या घोटाळ्याची पुष्टी करत नाही. TCS Jobs