Saturday, July 27, 2024

आमचा विजय निश्चित; विजयाची घोषणा होणं फक्त बाकी- समाधान आवताडे

- Advertisement -

समाधान आवताडे ( Samadhan Autade Bjp) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “आमचा विजय निश्चित होईल. विजयाची घोषणा होणं बाकी आहे. पांडुरंग परिवार आणि सर्व पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेची ताकत मिळाली. लोकं पाठिशी उभे राहिले. हा विजय जनतेचा आहे. सरकारच्या विरोधात जनतेनं दिलेला कौल आहे.”

भाजप : समाधान आवताडे : 101607

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 97212

मतमोजणी संथगतीने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या दिशेने जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पंढरपूरच्या शासकीय गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी संथगतीने होताना दिसत आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल यायला थोडा उशीर होऊ शकतो.

भाजपा वि. महाविकासआघाडी थेट सामना!

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles