महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती), नागपूर यांच्या वतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता मिळेल मोफत पोलिस प्रशिक्षण! (Police Bharti) संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
१२ वी उत्तीर्ण उमेवारांना निःशुल्क पोलिस प्रशिक्षण :-
महा ज्योती ही संस्था इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून बारावी उत्तीर्ण उमेदवारांना राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांसाठी निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Police Bharti)
पात्रता निकष:-
- उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा / असावी.
- उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा / असावी.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा / असावी.
- उमेदवार हा भटक्या जाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गांपैकी असावा / असावी.
- महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने सारखी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.
- यापूर्वी महाज्योतीच्या अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेत अधि छात्रवृत्तिचा लाभधारक नसावा.
Common Entrance Test| MHT CET परीक्षांचे वेळापत्रक जारी
urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली
gramsevak bharti |ग्रामसेवकभरतीचे ‘या’ दिवशी जाहीरहोणार वेळापत्रक
Pan card|…..तर पॅन कार्ड बंद होणार
आवश्यक कागदपत्रे:-
अर्जासोबत संकेतस्थळावर दिलेल्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची कागदपत्रे
- महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल प्रमाणपत्र
- जन्मताखरेचा दाखला
- बँक पासबुक
- बारावी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (गुणपत्रक)
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड.
अंतिम निवड ही कागदपत्रे पडताळणीच्या अधीन असतील.
पात्र उमेदवारांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
प्रशिक्षणाचा कालावधी – ४ महिने.
विद्या वेतन- दरमहा रुपये ६००० दिले जाईल
प्रवेश क्षमता एकूण ४०० त्यापैकी 30 टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.
ऑनलाइन अर्ज www.mahajyoti.org.in
या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड मधील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण 2023 या टॅब वर दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावा.
पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. (Police Bharti)
शंका समाधानासाठी महाज्योतीच्या कॉल सेंटरवर पुढील क्रमांकावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संपर्क साधावा.
८९५६७७५३७६/७७/७८/७९
- मोठी बातमी | पुण्यात १० हजार लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपात्र
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; मोठी बातमी
- पुणे महापालिका निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू
- रस्ते,ड्रेनेजलाईनसह प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांचा महापालिका अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा अल्टिमेटम
- विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष