राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विरोधात देशभरात भाजपकडून जाहीर निषेध |

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा बऱ्याच दिवसापासून सुरु आहे. मराठा आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी बरेच आंदोलने आणि उपोषणे केली आहेत. सध्या देशात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधीनी आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हा मुद्दा खूप चर्चेत आला आहे.

राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जे भाष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राहुल गांधींविरोधात भाजपकडून आंदोलनाची हाक दिली होती. भारतीय जनता पार्टी राहुल गांधींविरोधात चांगलीच आक्रमक झालेली आहे. काल दि. 13 सप्टेंबर रोजी  राज्यभरात राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले :

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काही दिवसांपासून आक्रमक झालेले होते. याचदरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला होता या प्रश्नाचे  उत्तर देताना म्हणाले, जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता येईल तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल.

याच मुलाखतीत राहुल गांधीनी एका वक्तव्यात म्हटले होते की, भारतात अजूनही विषमता आहे भारतात जर विषमता आणि सामाजिक भेदभाव संपुष्टात आला तर आरक्षण संपवण्याचा विचार केला जाऊ शकतो. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतात भाजप खूप आक्रमक झालेली आहे. भाजपच्या मते राहुल गांधी हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना दिलेले आरक्षण संपवण्याचा विचार करत आहेत. ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना दिलेले आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles