लवकरच तलाठी संवर्गातील १000 पदांची भरती | talathi bharti 2022

talathi bharti 2022 महसूल विभागांतर्गत प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसमवेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली.

गावोगावी कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार आणि वेळही ठरवून घ्यावी, असे निर्देश बैठकीत दिले. अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्वीट करून दिली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तलाठी भरतीची वाट पाहत असून लवकरच पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी अशी भावना लाईव्ह जनमतशी बोलताना विद्यार्थी यांनी केली.

पुणे महापालिकेच्या परीक्षेतील गैरप्रकार; परीक्षार्थीला रंगेहात अटक

https://twitter.com/RVikhePatil/status/1582078764091346944?s=20&t=wtmqPOdDV0qt9j6JJ003aA
  • श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते.
  • गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
  • तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा  भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
  • तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले. talathi bharti 2022

महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com