”राजाराम” ची मतदान नोंदणीची मुदतवाढ व्हावी, सभासदांची मागणी

राजाराम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन-चार महीने स्थानिक पातळीवरील निवडणुकांची धामधूम होती, त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याची मतदार नोंदणी बहुसंख्य सभासद करू शकले नाहीत. ३१ ऑक्टोंबर २०२२ ही मतदार नोंदणी करण्याची शेवटची मुदत होती. परंतु यावेळेत बहुसंख्य सभासद यांची मतदार नोंदणी झाली नसून महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० च्या कायद्यानुसार मतदार अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे, यातून सभासदांचे नुकसान होऊ नये म्हणून मतदार नोंदणीची मुदतवाढ ३१ मार्च करण्यात यावी अशी सभासदांच्याकडून मागणी होत आहे. मतदानाचा अधिकार मिळाल्याशिवाय राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका घेऊ नयेत अशा आशयाचे निवेदन सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

यावेळी वसंत दादू शिरगावे, राजेंद्र नामदेव शिंदे, विनोद नामदेव चव्हाण यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here