संविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस राक्षसी प्रवूत्तीला कायमचे गाढा -राजेश क्षीरसागर

कोल्हापूर दि.२८ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानात बदल केला जाणार असल्याचा अपप्रचार कॉंग्रेस कडून केला जात आहे. पण, कॉंग्रेस कडून जनतेमध्ये पसरविण्यात येणारा गैरसमज हा त्यांचा बालिश पणा आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह आजच्या कोल्हापूरच्या गादीचा पदोपदी अवमान फक्त कॉंग्रेसनेच केला आहे. त्यामुळे जी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होणे अपेक्षित होते ती निवडणूक अफवा, अपप्रचार आणि व्यक्तिगत टीकेवर घेवून जाण्यास कॉंग्रेस आणि त्यांचे राक्षसी प्रवृत्तीचे नेतेमंडळी कारणीभूत असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली.
महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ चांदणी चौक, यादवनगर येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभारले असताना त्यांच्या विरोधात उमेदवार देवून त्यांना पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसने केले. हा अवमान आजही जनता विसरली नाही आहे. छत्रपती घराण्याला राज्यसभेवर घेवून एन.डी.ए. महायुतीने राजघराण्याचा सन्मानच केला आहे. पण, समोर पराभव दिसल्याने आपल्या गळ्यातील उमेदवारीची माळ राजघराण्याच्या गळ्यात कॉंग्रेस नेत्याने घातली. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचा बळी द्यायची वृत्ती कॉंग्रेसची असून, अशा राक्षसी प्रवृत्तीला कायमचे गाढण्यासाठी महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, दादू शिंदे, सागर सोनटक्के, संदीप व्हगडे, गब्बर मुल्ला, अनिल चव्हाण, देवेंद्र खराडे, आदिनाथ साठे, अर्जुन बुचडे, सौ.बेनिझर नदाफ, अभिजित सूर्यवंशी, प्रेमसिंग रजपूत यांच्यासह भागातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com