भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामध्ये पुस्तकांवर बोलू काही म्हणजेच हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू करणारा उपक्रम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध पत्रकार सुधाकर काशीद यांनी उपस्थित सर्वांशी दिलखुलास संवाद साधला. मोबाईलच्या या दुनियेत पुस्तकाचे वाचन मागे मागे पडत चालले आहे. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. विचारांची देवाणघेवाणच बंद होत चालली आहे. यामुळे लोकांच्या मध्ये संवादही नीट होताना दिसत नाही. पुस्तक माणसाला हुशार बनवत. त्यामुळे असाच एक अनोखा उपक्रम भालचंद्र चिकोडे ग्रंथालया मार्फत घेण्यात येत आहे.
“कोल्हापूरच्या पाऊलखुणा” या प्रसिद्ध पुस्तकातील ठळक आठवणी तसेच कोल्हापुरातील जुन्या गोष्टींचा संपूर्ण आढावा घेत चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमाचे पहिले पाहिले संवादपुष्प म्हणून प्रसिद्ध पत्रकार सुधाकर काशीद यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यांनी कोल्हापूर मधील अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल भालचंद्र चिकोडे यांनी सर्वांचे आभार मानले.
त्याचबरोबर हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या दुस-या शनिवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भालचंद्र चिकोडे ग्रंथालय जरग नगर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल भालचंद्र चिकोडे यांनी दिली.