Friday, July 19, 2024

आज मला माझ्या मराठा जाती मुळे नोकरीपासून वंचित ठेवलंय -विद्यार्थ्याची भावनिक पोस्ट

- Advertisement -

काल डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या पुणे स्टेट बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लावण्यात आला. गेली दोन वर्ष संपूर्ण राज्यातील विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होती. त्यात मराठा आरक्षण रद्द झाले आणि परत एकदा उशीर झाला. याला मुख्य कारण होत ते म्हणजे महापरीक्षा पोर्टल. मोर्चे, आंदोलने काढण्यात आली, आणि शेवटी हे महापरीक्षा पोर्टल बंद केले गेले. पण त्या पोर्टल ची अद्यापही चौकशी करण्यात आलेली नाही.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे सरकारने एसईबीसी च्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस किंवा खुला गट निवडण्यासाठी सांगण्यात आलेल होत. पण काल लागलेल्या निकाल पाहून खूप एसईबीसी उमेदवारांना नोकरीपसून वंचित राहावं लागलेल आहे. मेरिट यादीत SEBC मधून पोस्ट काढलेल्या गजानन कावरखे या उमेदवारचे नाव आलेच नाही. त्यामुळे त्याने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

आज मी स्वतः SEBC आरक्षण cancel झाल्या मुळे आणि आमच्या हक्काच्या सर्व जागा open मधे गेल्या मुळे मी अंतिम यादी च्या बाहेर फेकले गेलो आहे.. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये लिपिक पदी निवड झाली होती..  डिसेंबर 2019 मधे तेव्हापासून आज पर्यत आशा होती आज संपली. आज माझा घात झाला आणि माझ्या सारख्या 2185 मुलांचा पण होणारच आहे. सरकारने हे सर्व मुद्दाम हून केल. डॉक्युमेंट verification जानेवारी 2020 मधे झाले होते. त्यानंतर 1 महिना होता नियुक्ती देण्यासाठी पण नाही दिली.. मग corona आला. मग आरक्षण कॅन्सल आणि आज यांनी फायनल लिस्ट revise करून लावली. जणू हे वाटच बघून होते कधी आरक्षण कॅन्सल होत आणि माझ्या सारख्या 2185 मुलांना हे कधी बाद ठरू शकतील. आज माझा आणि माझ्या समाजाचा घात झाला आहे आणि याला सर्वस्वी मी महाराष्ट्र सरकार आणि सर्व मराठा आमदार आणि नेते यांना जबाबदार मानतो आहे. आज च्या नंतर 2185 मुला पैकी कोणी ही वाईट मार्ग पत्करला किंवा कोणी स्वताः चे बरे वाईट केले तर त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि मराठा आमदार,खासदार हे असतील. आज मला माझ्या मराठा जाती मुळे नोकरी पासून वंचित ठेवले गेले आहे आणि याची परतफेड लवकरच होईल लक्षात घ्या. खर तर सुप्रीम कोर्टाने नकार दिला असताना सरकार ला इतर जातीचे 12000 बोगस अपात्र लोकांना नियुक्ती देता येते पण आम्ही मराठा 2185 मुल पात्र असताना आधिसंख्या जागा काढून नियुक्ती देता येत नाही. माझ्या सारख्या इतर मुलांनी काही चुकीचे पाउल उचलले तर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल. स्टेट बोर्ड च्या लिपिक भरती मधे ही 99% मुल पैसे भरून लागले आहेत.. त्यात टॉप मधले 10 लोकांची खरच चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल. MPSC ने कायमस्वरूपी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेले मुल टॉप मध्ये आली आहेत.. याची चौकशी व्हायला हवी. सरकार आमच्या हक्काच्या जागा विकत आहे.
गजानन कावरखे, sebc उमेदवार, हिंगोली. 
“राज्य सरकारने मागितलेली 21 दिवसाची वेळ संपलेली आहे. सरकारने शब्द दिलेला मराठा विद्यार्थ्यांना न्याय देतो म्हणून पण काल एका परिक्षेचा निकाल नवीन लावण्यात आला. त्यामुळे बरेच मराठा विद्यार्थी बाहेर पडले आहेत. आता त्यांच्या भविष्याच काय.? सरकारने खोटं बोलून वेळ मारून नेली, पण आता आम्ही शांत बसणार नाही. आता रस्त्यावरची लढाई चालू होईल.”
-सचिन तोडकर, ( मराठा समन्वयक, महाराष्ट्र राज्य.)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे.  जाहिरात :- १०/०९/२०१९
  • एकूण पदे २६६ पदाची
  • परीक्षा :- डिसेंबर २०१९
  • निकाल :- जानेवारी २०२०
  • कागपत्र पडताळणी :- फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण.
  • SEBC जागा एकूण ३५.
  • Ews मध्ये sebc समावेश झालेली मुल १८
  • Ews मुळे बाहेर पडणारे मराठा मुल १७

जेव्हा कोरोनाची  दुसरी लाट नव्हती  तेव्हा या विद्यार्थ्यांचे  डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालेलं होतं पण सरकारने मुद्दाम वेळ मारून नेली. संभाजीराजेनी  सरकार सोबत तीन ते चार वेळा बैठका घेतल्या. सरकार तेव्हा मराठा विद्यार्थ्यांना न्याय देतो असे म्हटले 21 दिवसाचे मुदत घेतली पण आता एकवीस दिवस होऊन गेले आणि सरकारने परत एकदा खोटे बोलून दाखवले. काल पुणे स्टेट बोर्ड च्या परीक्षेचा निकाल लावण्यात आला त्यामध्ये जवळपास सतरा मुलांना नोकरीपासून वंचित राहावे लागले . आता त्यांच्या भविष्याचं काय ? आई वडिलांनी कर्ज काढून त्यांना लहानाचे मोठे केलं आणि शेवटी सरकारने त्यांचा घात केला.  जीव गेल्यावर सरकारला जाग येणार आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करून पोस्ट काढूनही जर नियुक्ती मिळत नसेल तर हे सरकारच अपयश आहे. अश्या विद्यार्थ्यानी पैसे मिळवण्यासाठी काही वाईट मार्ग स्वीकारले तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल .      विश्वंभर  भोपळे , मराठा विद्यार्थी परिषद , महाराष्ट्र राज्य 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles