Thursday, November 21, 2024

उद्धव ठाकरे मोदींना संपर्क करण्याच्या प्रयत्नात ; भाजप सोबत पुन्हा मैत्री करणार ?

- Advertisement -

सध्या महाराष्ट्राचे राजकारण एका नवीन वळणावर येवून ठपल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात कोणत्या कोणत्या घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजप पक्षात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भजपात प्रवेश केल्याचं बघायला मिळालं आहे. हे सर्व चालू असताना आता आमदार रवी राणा यांच्या एका दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

हेही वाचा अजितदादांचा कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यावर अधिक भर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभेची प्रत्येक जागा भाजपसाठी महत्त्वाची असल्याने पक्षाकडून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. अगदी बुथ कमिटीच्या बैठकाही पार पडत आहेत. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या गोटात धास्ती पसरली आहे. अशातच आता भाजपशी जवळीक असलेले अपक्ष आ. रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे सध्या सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आतापर्यंत महाविकास आघाडीतील नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत. सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते भाजपविरोधी आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. परंतु, रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे हेच भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो, असे झाले आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, असे त्यांना झाले आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.

आमदार रवी राणा नेमकं काय म्हणाले पहा?

सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हंटले, उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सोबत येतील. “उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्याचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे मोदींचं नेतृत्व स्वीकारतील. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं रवी राणा म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीएमध्ये आले आहेत. तर उपमुख्यमत्री अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले आहेत, असादेखील दावा रवी राणा यांनी केला.

यावेळी रवी राणा यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहे. संजय राऊत हे दिल्लीत आहेत. पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दल बेगडी आदर आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles