Thursday, June 20, 2024

पात्र मराठा उमेदवारांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू- महेश जाधव

- Advertisement -

आज झालेल्या मराठा विद्यार्थी प्रतिनिधींच्या भेटीदरम्यान पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय महेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले आहे, की सकल मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी ही सदैव कटिबद्ध असेल. मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. याच काळामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी महाराष्ट्र राज्यात विविध विभागांच्या भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्या. परंतु कोविड या एकाच कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्रक दिली नाहीत. सरकारच्या दिरंघाईचा फटका सामान्य घरातील मुलांना बसत आहे. (We will force the government to give justice to the eligible Maratha candidates- Mahesh Jadhav)

विद्यार्थ्यांचे भवितव्य आड येणाऱ्या कोणत्याही समस्येचा अगदी रस्त्यावर उतरून नायनाट केला जाईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस विवेक वोरा उपस्थित होते.(give justice to the eligible Maratha candidates- Mahesh Jadhav)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles