kolhapur loksabha|मविआतील अंतर्गत वादाचा फटका शाहू महाराजांना बसणार?

kolhapur loksabha कोल्हापूर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन महाविकासआघाडी मधून शाहू महाराजांना उमेदवारी दिली. यावेळी उमेदवारी घेताना शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाची निवड केली. याचवेळी काही कट्टर शिवसैनिकानी उमेदवार देताना तो शिवसैनिकच हवा असा अट्टहास केलेला होता. मुळची शिवसेनेची असलेली जागा कॉँग्रेसने घेतल्याने अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात होते. पण कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देवू अस कुठेतरी अनऑफिशियल ठरलेल होत का असा लोकांना प्रश्न पडलेला आहे. कारण सांगली मध्ये जे घडल त्यामुळे मविआमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

शाहू महाराजांना उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठपुरावा केला होता. संपूर्ण महराष्ट्रात चर्चा रंगली होती. उमेदवारी अर्ज भरताना मोठ शक्तीप्रदर्शन होणार हे सर्वानी गृहीत धरलेल. पण त्यांचा उमेदवारी फॉर्म भरताना कोणतेही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी शिवसेनेचे कोणतेही वरिष्ठ नेतेही यावेळी आलेले नाहीत. त्यामुळे कुठेतरी आघाडी मध्ये बिघाडी झाली आहे का असा प्रश्न लोकांना पडला आहे. तस असेल तर कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक कॉँग्रेसच्या शाहू महाराजांना मदत करतील का हे येणारी वेळच सांगेल.

किंबहून याउलट महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा फॉर्म भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. kolhapur loksabha

abp माझा C Voter सर्वे नुसार कोल्हापूरचा ओपिनियन पोल | kolhapur loksabha

नुकताच ABP C Voter सर्वे ने महाराष्ट्रातील ओपिनियन पोल पब्लीश केला. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या विजयाची शक्यता सर्व्हेने दर्शवली आहे. या सर्व्हेनुसार कोल्हापुरात शाहू महाराजांना धक्का बसू शकतो. कोल्हापुरात सध्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. कोल्हापुरातील सहा विधानसभा क्षेत्राचा विचार करता तीन महायुती व तीन महाविकासआघाडीचे आमदार आहेत पण जिल्ह्यातील बहुतांश वरिष्ठ नेते सध्या महायुतीमध्ये असल्याने महायुतीचे पारडे जड असल्याचे या सर्व्हे मध्ये दिसून येत आहे.

लोकसभेसारख्या मोठ्या निवडणूकीसाठी स्वतःची यंत्रणा लागते. सध्या शाहू महाराजांकडे तशी कोणतीही यंत्रणा नाही ते पूर्णपणे सतेज पाटील यांच्यावर अवलंबुन आहेत. प्रचार यंत्रणेची संपूर्ण धुरा बंटी पाटील हे सांभाळत आहेत. विरोधकांवर आरोप किंवा त्यांना उत्तर द्यायचे असो यासंदर्भात आघाडीवर सतेज पाटील हेच दिसतात. शाहू महाराज यामध्ये कुठेही फारसे दिसून येत नाहीत.

महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद

महाराष्ट्रात सांगली, मुंबई अश्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या सुरु आहेतच. शिवाय सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचे ठरवले आहे. याचा परिणाम कोल्हापूर लोकसभेवर ही होताना दिसत आहे. उध्वव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कोल्हापूर बाबतीत फारसे सक्रीय दिसत नाहीत. कार्यकर्त्यांच्या मनात आपला पारंपारिक गड काँग्रेसला सोडल्याची खंत आहेच.

महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्याच्या निवडणुका पार पडत आहेत याठिकाणी काँग्रेसकडून बहुतांश उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांची या टप्प्यातील प्रचारात कुठेही आघाडी दिसून येत नाही. एकंदरीत महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींचा परिणाम कोल्हापूरवरही होणार का हे पहावे लागेल.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com