महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूर लोकसभा | Kolhapur LokSabha

0 4,187

चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यापूर्वी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार होते. ते खासदार झाले तेव्हा शरद पवारांनी त्यांना पेशव्यांच्या इतिहासाचा दाखला देत डिवचले होते. संभाजी राजांचे सहा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी शिवसेनेकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या म्हणजे त्यांनी शिवसेना या पक्षातून राज्यसभेची निवडणूक लढवावी पण संभाजी राजेंनी ती मान्य केली नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन केला आहे. हा पक्ष नाशिक सोलापूर या ठिकाणी कार्यरत दिसून येतो. पण त्याची पक्ष संघटना कुठेही दिसून येत नाही. 2024 साठी पुन्हा त्यांचं नाव महाविकास आघाडीतून कोल्हापूरचे उमेदवार म्हणून पुढे आणले गेले होतो. पण यावेळीही त्यांना काही अटी होत्या. त्या म्हणजे महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षातून त्यांनी निवडणूक रिंगणात उतरावे पण याही वेळी त्यांना ती अट मान्य नाही आणि ते स्वतंत्र स्वराज्य पक्षातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.Kolhapur LokSabha 

महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण हे अस्थिर झाले आहे. आणि या अस्थिरतेला कारण होत ते म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांनी त्यावेळी निवडणूक लढवण्याची व्यक्त केलेली इच्छा. या राजकीय उलथापालतीची सुरुवात 2022 च्या मे महिन्यामध्ये झाली होती. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होतं व त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते. त्यावेळीही राज्यसभा निवडणूक आली होती. तेव्हा सहा उमेदवार रिंगणात होते यावेळी प्रमुख असे कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना यांचे प्रत्येकी एक आणि भाजपचे दोन उमेदवार निवडून येतील हे सर्वांना माहिती होतं फक्त सहावा उमेदवार कोण निवडून येईल याची उत्सुकता सर्वांना होती. सहावा उमेदवार जिंकून येण्यासाठी प्रमुख पक्ष सोडून इतर सर्व पक्षांची व अपक्षांची गरज लागणार होती. संभाजी राजे यांचे असे मत होतं की सर्व पक्ष व अपक्ष यांचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे शिवसेनेमध्ये न येता मी अपक्ष म्हणून उभा राहीन व मला सर्वांनी मदत करावी.

राज्यसभेसाठी तिन्ही उमेदवारांची चर्चा ही कोल्हापूर लोकसभेतीलच | Kolhapur LokSabha

- Advertisement -

पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना डावलून कोल्हापूरचे शहराध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी दिली. यावेळी संभाजी राजे या राज्यसभा निवडणुकीपासून अलिप्त राहिले आणि तेव्हा कोल्हापुरातील धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभा निवडणुकीत उतरवले आणि न भूतो न भविष्य अशी निवडणूक होऊन धनंजय महाडिक हे निवडून सुद्धा आले. राज्यसभेसाठी ज्या नावांची चर्चा चालू होती ते तिन्हीही उमेदवार हे कोल्हापूर लोकसभेतीलच होते. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. 10 जून 2022 रोजी ही निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही मते फुटली. यानंतर पुढल्या वीस दिवसात महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले व शिवसेनेत मोठे बंड झाले.

आज पुन्हा एकदा संभाजी राजेंना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि पुन्हा महाविकास आघाडी त्यांना आपल्या कोणत्यातरी एका पक्षात येऊन कोल्हापुरातून लोकसभा रिंगणात उतरा असे सांगत आहेत. हा फक्त योगायोग समजायचा की महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी उलथा पालट होणार हे येणारा काळ ठरवेल. कारण गेली काही महीने राज्यात कॉँग्रेसचे अनेक बडे नेते नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे समजत आहे. राज्यसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले असून त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नडा यांची भेट घेतली आहे. मोदींचा वाढलेला महाराष्ट्र दौरा आणि इडिया आघाडीतील फुट तसेच महाराष्ट्रातील आघाडीच्या नाराज नेत्यांचा छुप्या होत असलेल्या भेटी हेच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीआधी राजकीय भूकंपाचे संकेत देत आहेत. Kolhapur LokSabha

Leave A Reply

Your email address will not be published.