पुण्याच्या कँप परिसरातील फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात आगीचा मोठा भडका उडाला. अग्नीशमन दलाच्या १६ बंबगाड्या आणि २ पाण्याचे टँकर यांच्या मदतीने पहाटे आगीवर १ वाजून ६ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत ५०० दुकानं जळून खाक झाली. जीवितहानी झाली नाही पण स्थानिक व्यावसायिकांचे लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अग्नीशमन दलाचे १० अधिकारी आणि ५० कर्मचारी यांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले; अशी माहिती पुणे मनपाच्या अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. पुण्यातील फॅशन स्ट्रीट हे तोकड्या जागेतील रेडीमेड कपड्यांचे मोठे मार्केट आहे. परवडणाऱ्या दरात या ठिकाणी अनेक नवनव्या फॅशनचे कपडे उपलब्ध असतात.