आरोग्य विभाग मध्ये महापोर्टल ची पुनरावृत्ती

Live Janmat

 दि.28/02/2021 रोजी आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात आली.महाआईटी विभागाने निवडलेल्या एका खाजगी कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली.

28 फेब्रुवारी 2021 ला झालेल्या आरोग्य विभाग भरतीमधील काही परीक्षेचे निकाल विभागाने लावले आहेत. त्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. विभागाने नुसते मार्क दाखवून डायरेक्ट मुलांशी संपर्क केला आहे. विद्यार्थ्यांची निवडयादी, प्रतीक्षा यादी काहीही लावण्यात आलेली नाही. त्यांची डायरेक्ट निवड करण्यात आली आहे. हा घोळ विभागामार्फत झालेला आहे त्यातच महापरिक्षा पोर्टल मध्ये जसे अत्याधुनिक साहित्य वापरून काही लोकांनी घोळ केलेला होता त्याप्रमाणे या परीक्षा मध्ये ही करण्यात आलेला आहे.

  • ही परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यानी केलेली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
  • या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असूनही त्यांना मेल करून कागदपत्र तपासणीसाठी बोलावले आहे.
  • ज्यांना अधिक गुण मिळालेली आहेत ते अजूनही ई मेलची वाट पाहत आहेत.
  • अंतिम यादी न लावता कोणत्या आधारावर कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थ्यांना बोलावले जावू शकते? असा सवाल विद्यार्थ्यानी उपस्थित केला आहे.

 परीक्षा वेळेस औरंगाबाद आणि अहमदनगर येथे काही जण अत्याधुनिक साहित्य वापरून कॉपी करतांना पकडले पण यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. खूप मोठे रॅकेट आहे. खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून हे पद मिळवले आहेत. ठाणे येथील सिनिअर clerk चा निकाल लागला त्यात 2 जण एकाच गावचे आणि त्यांना मिळणारे मार्क पण सारखेच त्यांचा जर पेपर भेटला तर नक्कीच त्यांची चुकलेले प्रश्न देखील सारखेच असणार कारण यांनी अत्याधुनिक साहित्य वापरून मार्क मिळवले आहेत असे राहुल कवठेकर यांनी संगितले आहे.

आरोग्य विभागात झालेल्या भरती मध्ये निवड याद्या न लावता उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवीन्यात येत असल्याचे पत्रे समोर आली आहेत. ही पूर्ण भरती प्रक्रिया भ्रष्ट पद्धतीने पार पडली आहे त्यामुळे आरोग्य विभागाला निवड यादी पब्लिकली जाहीर करण्यास संकोच वाटत असावा. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती प्रक्रिया पुढे रेटून नेऊ देणार नाही. त्यामुळे सर्व सरळ सेवा भरती एमपीएससी कडे देण्यात यावी.

मनोज गोविंद आदटराव(सोलापूर)

follow us

आरोग्यसेवा भरती असो की अन्य गट ब आणि क परीक्षा यामध्ये खाजगी  कंपनीचा प्रश्नपत्रिका दर्जा व परीक्षा नियंत्रण यामधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या तृटी यावरून असे लक्षात येते की, सर्व गट ब (अराजपत्रीत) आणि क परीक्षा या एमपीएससी मार्फत होणे गरजेचे आहे. खाजगी कंपनी द्वारे घेतलेल्या परीक्षा मध्ये, सरकार बदलेले  असले तरी डमी रॅकेट कमी झालेले नाही, हे आज 20 एप्रिल 2021 आरोग्य विभाग च्या निकालावरून स्पष्ट दिसून आले.

सुषमा वायकुळे (विद्यार्थिनी )

खाजगी कंपनीला विरोध का ?

तत्कालीन फडणवीस सरकारने महापरीक्षेमार्फत मोठया प्रमाणावर नोकर भरती केली होती. त्यामध्ये मोठया प्रमाणावर विद्यार्थी पैसे देवून लागलेले होते. असा आरोपही झाले आहेत. म्हणून विद्यार्थ्यानी याच्या विरोधात मोर्चे काढून ते बंद ही पाडले.

ताज्या बातम्यासाठी Email Subscribe करा.

पण नवीन सरकार आले महापरीक्षा बंद केल पण त्यांनीही परत एकदा खाजगी कंपनी ची परीक्षा घेण्यासाठी निवड केली. एमपीएससी समन्वय समितीने याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आलेली आहेत. वेळोवेळी त्यांनी निवेदन देवून सर्व शासकीय नोकर भारती ही एमपीएससी आयोगाकडून घेण्यात यावी यासाठी आंदोलनही उभे केले आहे.

परीक्षेदिवशीच गोंधळ

परीक्षेला विद्यार्थी कोरोनाच्या काळात 500 km दूर परिक्षासाठी गेले पण त्यांच्या नशिबी घोर निराश्या आली. काही सेंटर वर परीक्षा होणार आहे हे त्या सेंटर वरील प्रशासनाला माहीतच नव्हते. काही ठिकाणी तर पेपर आधीच फुटले होते तर काही ठिकाणी मुले एकत्र येऊन पेपर सोडवत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here