खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही. देशमुखही धमक्या देत देतच गेले- चंद्रकांत पाटील

0 1

- Advertisement -

पोलिसांवर दबाव खपवून घेणार नाही; गृहमंत्र्यांचा इशारा..!

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळेच सर्व काही केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी असं राजकारण करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करताय. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असं पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. 

रेमडेसिवीरवरून आरोप-प्रत्यारोप

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देऊ नका, कंपन्यांना केंद्र सरकारनं असा आदेश दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी (17 एप्रिल) केला.

राज्यातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय, असं भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, “नवाब मलिक यांनी असे निराधार आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावेत, अन्यथा माफी मागावी. महाविकास आघाडीनं आरोप करण्याचा खेळ थांबवून, साथ कशी रोखता येईल याकडे लक्ष देण्याची ही वेळ आहे.”

- Advertisement -

Follow us

महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सने रॅमडेसिव्हिरबद्दल जारी केलं पत्र

रेमडेसिव्हिरच्या वापराबाबत महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सने पत्र जारी केलं आहे. या पत्रात त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.

  • रॅमडेसिव्हिरला कोव्हिड-19 विरोधात वापराची आपात्कालीन परवानगी मिळाली आहे. पण हे ड्रग प्रायोगिक तत्वावर वापरण्यात येत आहे रॅमेडेसिव्हिर के जीव वाचवणारं औषध नाही.
  • याच्या वापरामुळे मृत्यू कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलेलं नाही रॅमेडेसिव्हिरच्या वापरामुळे रुग्णालयातल दाखल होण्याने दिवस कमी होतात असं अभ्यासात दिसून आलंय.
  • रॅमडेसिव्हिर फक्त आणि फक्त रुग्णालयात देण्यात यावं रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी ज्यांना मध्यम स्वरूपाचा आजार आहे आणि ऑक्सिजनवर असलेल्यांना दिलं जावं पाच दिवस देण्यात यावं.
  • आजाराच्या पहिल्या 9-10 दिवसात द्यावं रॅमेडेसिव्हिरचा अनावश्यक वापर करू नये

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.