राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना काल सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रविवार सायंकाळी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या चाचण्या केल्या. यात त्यांना पित्ताशयाचं विकाराचं निदान झालं आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचं निदान झालं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.
मलिकांनी ट्विट करून दिली माहिती
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी 29 मार्चला ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं की, “कृपया लक्ष द्या. आमचे नेते शरद पवार साहेब यांना पोटात दुखत असल्यामुळे काल रात्री ब्रीच कँडीमध्ये तपासणीसाठी दाखल केलं. तपासणीनंतर लक्षात आलं की त्यांना पित्ताशयासंबंधी त्रास होतो आहे.”