वयोमर्यादा वाढवून Mpsc च्या परीक्षा पुढे ढकला- आमदार संजयमामा शिंदे

Live Janmat

कोरोनामुळे mpsc ची परीक्षा पुढे ढकलून सर्व घटकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी.


देशात सर्वत्र कोरोनाचा वाढ वेगाने होत असून स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे अनेक विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव आलेले असून काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून सर्व घटकांतील वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.

लॉकडाऊन मुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, नाशिक, नांदेड, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे बरेच विद्यार्थी आहेत. पुण्या मध्ये राहून mpsc ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेचे सेंटर पुणे व आसपासच्या परिसरात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही पुण्यातच राहून तयारी करत आहेत. यातच वैभव शितोळे आणि प्रतीक कांबळे या mpsc च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला .या मुळे भीतीचं खूप मोठं वातावरण निर्माण झाले आहे.अनेक अभ्यासिकेतील विद्यार्थी आजारी असतानाही मेडिकलच्या गोळ्यांवर दिवस काढत आहेत….!! जर परीक्षा घेतलीच तर खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here