Monday, March 20, 2023
No menu items!
Homeमहाराष्ट्रविरारची घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी - राज ठाकरे

विरारची घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी – राज ठाकरे

सध्याच्या या कोरोनाच्या काळात धक्कादायक घटना घडत आहेत. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने २४ रुग्णांना आपली जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आता विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रोष व्यक्त केला असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. नाशिकमधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूपमधील घटना असो, या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचनाही राज यांनी केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular