गेली काही महीने कोरोना आणि मराठा आरक्षणामुळे शासकीय नोकरभरती रखडली गेली होती. काल मा.सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे आता नोकर भरतीसाठी राज्यसरकार आता कामाला लागले आहे अस दिसत आहे.
राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार अशी चार हजार पदे भरली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. (Immediate recruitment of 16,000 posts in health department)
- गट अ पदाची भरती ही एमपीएससी द्वारे करण्यात येणार आहे, तर
- ट क आणि ड गटाची भरती ही एजन्सिद्वारे करण्यात येणार आहे. असे राजेश टोपे यांनी संगितले.
नोकर भरतीच्या update साठी तुमचा Email Subscribe करा.
मागे झालेल्या आरोग्य भरती मधील गोंधळामुळे विद्यार्थ्यानी खाजगी एजन्सिद्वारे परीक्षा घेण्यास विरोध केला होता. सर्व परीक्षा या एमपीएससी आयोगाकडून घेण्यात याव्यात अशी मागणी केलेली होती. एमपीएससी समन्वय समिती मागे झालेल्या आरोग्य भरती घोटाळ्याविरोधात न्यायालयात जाणार आहे.
MPSC |आरोग्य भरती विरोधात MPSC समन्वय समिती याचिका दाखल करणार
MPSC समन्वय समितीच्या मागण्या
- आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ही परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी.
- गट-क ते गट-ड या सर्व पदांची शासकीय नोकर भरती यापुढे फक्त MPSC मार्फतच घेण्यात यावी.
- महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील SIT समितीने करावी.