MPSC |आरोग्य भरती विरोधात MPSC समन्वय समिती याचिका दाखल करणार

1 0

- Advertisement -

आरोग्य विभाग भरतीमधील काही परीक्षेचे निकाल विभागाने लावले आहेत. त्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. विभागाने नुसते मार्क दाखवून डायरेक्ट मुलांशी संपर्क केला आहे. विद्यार्थ्यांची निवडयादी, प्रतीक्षा यादी काहीही लावण्यात आलेली नाही. त्यांची डायरेक्ट निवड करण्यात आली आहे. हा घोळ विभागामार्फत झालेला आहे त्यातच महापरिक्षा पोर्टल मध्ये जसे अत्याधुनिक साहित्य वापरून काही लोकांनी घोळ केलेला होता त्याप्रमाणे या परीक्षा मध्ये ही करण्यात आलेला आहे.

students in exam

आरोग्य विभागाच्या निकालानंतर आज पुनः स्पष्ट झाललेल आहे की या भरती मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, महा-आयटी/खासगी कंपन्या या सरकारी नोकर भरती पारदर्शकपणे करू शकणार नाहीत. भाजप काळातील “महापरिक्षा पोर्टल” व आताच्या मविआ यांनी नियुक्त केलेल्या आयटी कंपन्या सारख्याच भ्रष्ट आहेत.

MPSC समन्वय समितीच्या मागण्या

  • आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ही परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्यात यावी.
  • गट-क ते गट-ड या सर्व पदांची शासकीय नोकर भरती यापुढे फक्त MPSC मार्फतच घेण्यात यावी.
  • महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील SIT समितीने करावी.

सर्वोच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांच्या मार्फत MPSC समन्वय समिती न्यायालयात आरोग्य भरती रद्द करण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी याचिका दाखल करणार आहेत.  “महापरीक्षा पोर्टल” विरुद्ध पहिली केस अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनीच जिंकलेली आहे, ते विशेष तज्ञ आहेत. 

आमची पूर्ण टीम मागील काही दिवसापासून आरोग्य विभातील घोटाळ्यांचे पुरावे बाहेर काढण्यात व्यस्त होती, त्याबाबत आम्ही एक रिपोर्ट बनविला असून तो कोर्टात सादर करणार आहोत. यापुढे होणाऱ्या सर्व गट-क ते गट-ड च्या स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती,जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, शिक्षक भरती यासारख्या परीक्षांचे भवितव्य या याचिकेमुळे ठरणार आहे.

 राहुल कवठेकर, MPSC समन्वय समिती

परीक्षेची काठिण्य पातळी पाहता 200 पैकी 198 गुण मिळणे शक्य नाही. आरोग्य विभागाच्या निकालावरून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे या भरती प्रक्रियेला कायदेशीर आवाहन देता येणार आहे.

निलेश गायकवाड , MPSC समन्वय समिती

- Advertisement -

महापरीक्षा पोर्टल 

महापरीक्षा पोर्टल मध्ये व्यापम पेक्षा मोठा घोटाळा झालेला आहे. हा सर्व घोटाळा MPSC समन्वय समितीने उघडकीस आणला होता. त्यावेळी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आले. परंतु त्यावेळी आमची मुख्य मागणी होती की एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महापरिक्षा पोर्टल मध्ये झालेल्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी लावण्याची मागणीही या याचिकेत असणार आहे, असे विश्वंभर भोपळे यांनी संगितले.

ताज्या बातम्यासाठी Email Subscribe करा.

आरोग्यसेवा भरती असो की अन्य गट ब आणि क परीक्षा यामध्ये खाजगी  कंपनीचा प्रश्नपत्रिका दर्जा व परीक्षा नियंत्रण यामधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या तृटी यावरून असे लक्षात येते की, सर्व गट ब (अराजपत्रीत) आणि क परीक्षा या एमपीएससी मार्फत होणे गरजेचे आहे. खाजगी कंपनी द्वारे घेतलेल्या परीक्षा मध्ये, सरकार बदलेले  असले तरी डमी रॅकेट कमी झालेले नाही, हे आज 20 एप्रिल 2021 आरोग्य विभाग च्या निकालावरून स्पष्ट दिसून आले.

सुषमा वायकुळे (विद्यार्थिनी )

follow Us

- Advertisement -

1 Comment
  1. […] MPSC |आरोग्य भरती विरोधात MPSC समन्वय समिती… […]

Leave A Reply

Your email address will not be published.