11,903 आरोग्य विभागातील जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार

0 3

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ठाणे पालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. आता सध्याची शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवकांची संख्या पाहता तातडीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात अल आहे. आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात जवळपास 12 हजार जागांसाठी जाहिरात निघणार आहे.

ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य सेवक भरतीला वेग आला असून पुढील आठवड्यात 11,903 जागांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी ही जाहिरात असेल. अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती.

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.  सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.  त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय. 

- Advertisement -

सध्या तलाठी भरती, वन भरती मधील अनेक गैर प्रकार समोर आलेले आहेत. आता भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पेपेर फुटीसंदर्भात कठोर कायदा करण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिति आक्रमक आहे.

अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा सर्व अतिरिक्त भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.