आज दि. १९ सप्टेंबर गुरुवार रोजी कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात पारंपारिक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि डिप्लोमा या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे १०० शुल्क राज्य सरकार भरणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केली होती. त्यानंतर आता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्धतेचे एक मोठे आव्हान आहे. जगातील अनेक देश मनुष्यबळासाठी भारतावर अवलंबून आहेत. कट्ट्यावरती महिलांना दुपारच्या चार तासात रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक असे छोटे अभ्यासक्रम तंत्रनिकेतनाने तयार करावीत असे त्यांनी सांगितले.
या महाविद्यालयासाठी आणि अन्य इमारतींसाठी १७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक कौशल्य मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant patil) यांनी सांगितले.