Friday, November 22, 2024

10 वी पास झाला म्हणून भावाची थेट उंटावरुन मिरवणूक | kolhapur SSC Result

- Advertisement -

काल इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता दहावीला राज्यात विद्यार्थीनींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. राज्यात नागपूर विभागाचा सर्वात कमी 92.49% निकाल लागला आहे, तर कोकण विभागाने 98.11% मार्क मिळवत अव्वल स्थान बळकावलं आहे. kolhapur SSC Result

Talathi Bharti 2023 | 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश

निकालानंतर सर्वानी जल्लोष केला. कोल्हापुरात मात्र हा जल्लोष अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. कोल्हापूर मधील गंगावेश परिसरात राहणारा समर्थ सागर जाधव या विद्यार्थ्यांची त्याच्या मित्रानी त्याची चक्क उंटावरून मिरवणूक काढून आनंद साजरा केला. दहावीचे वर्ष असल्यामुळे घरातून आणि मित्रांकडून वारंवार अभ्यास कर, अशा सूचना मिळत होत्या. तो मात्र सूचनांकडे दुर्लक्ष करत तो आपल्याच नादात मित्र आणि सवंगड्यांमध्ये गुंतलेला असायचा. समर्थ दहावी पास होणार की नाही? याची अनेकांना तशी शंकाच होती; मात्र काल दहावीचा निकाल लागला आणि त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांनीही गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे. kolhapur SSC Result

10वी नंतर पर्यायाची निवड करताना या चुका टाळा| ssc result

समर्थ सागर जाधव हा कोल्हापुरातील एस एम लोहिया या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. शाळेत अभ्यासात कमी आणि दंगा घालण्यात एक नंबर असलेला मुलगा. यामुळे शाळेतील अनेक मित्र त्याला “तू पास होणार नाही”, असे वर्षभर चिडवत होते. मात्र, पठ्ठ्याने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत तब्बल 51 टक्के गुण घेत पास झाला. यामुळे जे मित्र तू पास होणार नाही, असं म्हणत होते. त्याच मित्रांनी त्याला उंटावर बसवून कोल्हापुरच्या गंगावेश परिसरातून त्याची मिरवणूक काढली. तर गुलालाची उधळण करत आणि वाजत गाजत पेढे भरवत मिरवणूक काढल्याने या मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापुरात होत आहे.

निकालाबाबत आपल्या मनात शंका असेल तर येथे क्लिक करा | sscresult.mkcl.org

गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी उद्यापासून अर्ज करा

आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्याना गुणांबाबत काही अडचण असल्यास गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 3 ते 11 जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.

Mahresult.nic.in | SSC Result live

Mahresult.nic.in | ९३.८३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास

how to check Maharashtra SSC 10th Result 2023

दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे. Maharashtra SSC Result 2023

विभागवार निकाल | ssc result 2022 maharashtra board

कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक | Check Maharashtra Board 10th Result 2023 

१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org


 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles