एमपीएससी च्या उमेदवारांना नियुक्तीबाबत परत एकदा आश्वासन…

Live Janmat

काल मुंबई मध्ये झालेल्या बैठकीत SEBC प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतरच एमपीएससीला वाचा फुटली, अखेर महाविकास आघाडी सरकारला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे.

मागील आठवड्यात पुण्यामध्ये एमपीएससी च्या नियुक्त्या रखडलेल्या उमेदवारांनी आंदोलन केलेलं. या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या नियुक्त्या बाबत बैठक लावलेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज ही महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. त्याच बरोबर केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. पदभरती संदर्भात वित्त विभागाने लागू केलेले निर्बंध शिथिल करून १५५५१ रिक्त पदांची तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच एमपीएससी आयोगावर 31 जुलैपर्यंत 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

https://twitter.com/bharanemamaNCP/status/1414995631270031367?s=20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here