कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीची धुरा बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या हाती

0 13

राष्ट्रवादी विभागल्या नंतर अजित पवार यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रिक्त असलेले जिल्हाध्यक्ष पद हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील (Babasaheb patil) आसुर्लेकर यांना दिले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. कोल्हापूर मध्ये हसन मुश्रीफ यांच्यानंतर जिल्हाध्यक्षपदी प्रमुख असलेले ए.वाय.पाटील हे गेल्या तीन चार महिन्यापासून पक्षात सक्रिय नव्हते. त्यामुळे पक्षाची संघटना वाढवण्यावर ज्यांनी काम केले ते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व शाहूवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.

- Advertisement -

पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असताना जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन करू. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील (Babasaheb patil) आसुर्लेकर.

ए.वाय.पाटील यांची हकालपट्टी

कार्यरत जिल्हा अध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी बिद्री साखर कारखाना निवडणुकीवेळी हसन मुश्रीफांविरोधात घेतलेले पंगा त्यांना महागात पडला आहे. बिद्रीच्या निकालानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती. याउलट अजितदादांशी एकनिष्ठ असलेले बाबासाहेब पाटील (Babasaheb patil) आसुर्लेकर यांना संधी मिळाली आहे.

कोण आहेत बाबासाहेब पाटील आसुर्लेकर

पूर्वीपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी पन्हाळा-शाहुवाडी परिसरात राष्ट्रवादीची धुरा यशस्वी सांभाळली आहे. KDC Bank निवडणुकीवेळी विनय कोरेंसारख्या दिग्गज नेत्याला टक्कर देत निवडूण येवून अख्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.