Monday, May 29, 2023
No menu items!
Homeदेश-विदेशमोठी बातमी | DAP वर आता 500 नव्हे, तर थेट 1200 रुपयांचे...

मोठी बातमी | DAP वर आता 500 नव्हे, तर थेट 1200 रुपयांचे अनुदान मिळणार

मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

खतांच्या किमतींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि कॅबिनेट मंत्री सदानंद गौडा उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना खतांच्या दरांविषयाची सविस्तर माहिती एका सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किमतींमुळे खतांचे दर वाढत असल्याची बैठकीत चर्चा झाली. Big news | DAP will now get a direct grant of Rs. 1200 will be given

आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या असूनही जुन्या दराने शेतकर्‍यांना खत मिळाले पाहिजे यासाठी मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला. उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाय अमोनियम फॉस्फेट (DAP) खतावरील अनुदानात 140 टक्क्यांनी वाढ करत असल्याची घोषणा केलीय. म्हणजेच एका पोत्यावरील अनुदान आता 500 रुपयांऐवजी 1200 रुपये करण्यात आलेय. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे 2400 रुपयांऐवजी DAP खताची एक बॅग आता फक्त 1200 रुपयांत मिळणार आहे. Big news | DAP will now get a direct grant of Rs. 1200 will be given

केंद्रातील मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयानुसार डीएपी खतासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम प्रत्येक बॅगेमागे 500 रुपयांवरून थेट 140 टक्‍क्‍यांनी वाढून 1200 रुपयांपर्यंत करण्यात आलीय. अशा प्रकारे DAP च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली तरी ती केवळ 1200 रुपयांच्या जुन्या दराने देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच केंद्र सरकारनेही दरवाढीचा संपूर्ण भार सोसावा, असा निर्णय घेतलाय. आतापर्यंत प्रति बॅग अनुदानाचे प्रमाण एकाच वेळी कधीही वाढविण्यात आले नाही. मागील वर्षी डीएपीची वास्तविक किंमत प्रति बॅग 1,700 रुपये होती.

ज्यामध्ये केंद्र सरकार प्रति बॅग 500 रुपये अनुदान देत होती. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना प्रति बॅग 1200 रुपये दराने खत विक्री करीत होत्या. नुकत्याच DAP मध्ये वापरल्या जाणार्‍या फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादी आंतरराष्ट्रीय किमती 60% वरून 70% पर्यंत वाढल्यात. या कारणास्तव डीएपी बॅगची वास्तविक किंमत आता 2400 रुपये आहे, जे खत कंपन्या 500 रुपयांच्या अनुदानावर 1900 रुपयांना विकतात. आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फक्त 1200 रुपयांमध्ये डीएपी खताच्या पिशव्या मिळतील. Big news | DAP will now get a direct grant of Rs. 1200 will be given

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular