Saturday, April 1, 2023
No menu items!
Homeशिक्षणराजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बारावीच्या परीक्षांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता?

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बारावीच्या परीक्षांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 12वी (12th Board exam) च्या परीक्षा बाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या लांबलेल्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करणे संबंधी उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईनं विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षा आयोजित करण्याबाबत पर्यायांवर विचार करावा, अशा सूचना दिल्या होत्या. बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याविषयचीच्या पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यत आहे.

रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून या बैठकीत विषयी माहिती दिली आहे. या बैठकीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे असेल. या बैठकीला महिला आणि बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक होत आहे. आज होणाऱ्या सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  हे भूषवणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल.या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular