कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसचे प्रमाण अधिक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी सावधानगिरीचा सल्ला दिला आहे. मधुमेहाच्या रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर ब्लॅक फंगस होण्याचा धोका आहे.
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
‘म्युकरमायकोसिस’ च्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार
‘म्युकर मायकॉसिस’ आजाराची लक्षणं?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची चार प्रमुख लक्षणं सांगतात.
- नाकातून रक्त येणं
- मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
- डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते
मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशिअन डॉ. हनी सावला ‘म्युकर मायकॉसिस’ची चार प्रमुख कारणं सांगतात.
- अनियंत्रित मधुमेह. शरीरातील सारखेचं अनियंत्रित प्रमाण
- स्टीरॉईडचा अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापर
- ब्रॉड स्पेक्ट्रम एन्टीबायोटिक्स
- शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणं
ब्लॅक फंगस संसर्गाचा धोका कसा टाळायचा?
ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीचे प्रमाण रक्तप्रवाहातील अतिरिक्त साखरेच्या पातळीमुळे वाढते. या माध्यमातून शरीराच्या अवयवांना संक्रमित करते. त्यामुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित कशी राहील, याकडे गांभीर्याने लक्ष द्या.
स्टेरॉयड्सच्या माध्यमातून उपचार केल्यास विशेष सावधगिरी बाळगा
मध्यम ते गंभीर कोरोना संक्रमणामध्ये केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये स्टेरॉयडच्या औषधांचा समावेश असतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, डॉक्टरांनी मधुमेहाच्या रूग्णांवरील कोरोनाच्या उपचारांचा स्टेरॉयडशी संबंध जोडला आहे. जर नंतर ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहान यांच्या म्हणण्यानुसार, ब्लॅक फंगसवर नियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्टेरॉयड्सचा योग्य वापर आणि मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवणे. तज्ज्ञांनी दिलेल्या या वैद्यकीय सल्ल्यांचे पालन करून तुम्ही ब्लॅक फंगसचा धोका दूर ठेवू शकता व स्वत:ला संसर्गापासून वाचवू शकता.