Saturday, July 27, 2024

“रिनायसेन्स स्टेट” या पुस्तकावर बंदी आणा -राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचा इशारा

- Advertisement -

गेली काही दशके छत्रपती घराणे व क्षत्रिय घराण्यांच्या बद्दल जाणीवपूर्वक खोटा इतिहास पसरवला जात आहे. काही व्यक्ती व संघटना आहेत जे कायम छत्रपती घराणे व महाराष्ट्रातील क्षत्रिय घराण्यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने खोटा इतिहास लिहीत आहेत व पसरवत आहेत ज्याला समकालीन कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात रिनायसेन्स स्टेट (Renaissance State) मध्ये देखील असच चुकीचे छत्रपती घराण्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी असं का लिहले किंवा त्यांचा बोलवता धनी अजून कोणी आहे का हेही तपासावे लागेल कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी अवमानकारक लेखन करताना इतिहास अभ्यासला नाही त्यांचे लेखन एकांगी व विकृत असेच आहे

छ. संभाजीराजे म्हणजे या भारतभूमीच्या इतिहासातील एक अद्वितीय रत्न, ज्याला पैलू पाडण्याचं काम स्वता शिवरायांनी केले.छत्रपती संभाजीराजांनी सोयरामातोश्रींना ठार मारले की नाही हे आता नव्याने कुणाला सांगण्याची गरज नाही. सोयरामातोश्री मनाने निर्मळ आहेत असे स्वता संभाजीराजे यांचे शब्द आहेत. व हे अनेक इतिहासकारांनी पुराव्यानिशी मांडलेलं आहे.

बेंद्रे यांच्या संशोधनाला कित्तेक दशके लोटलीत कुबेरांसारख्या अभ्यासू माणसाने इतिहासावर पुस्तक लिहण्याआधी बेंद्रे किंवा इतर काही इतिहास संशोधक यांचं संशोधन विचारात घेतलं नाही हेच दिसून येते. या संपूर्ण गोष्टी बघितल्यावर व लक्षात घेतल्यातर या गंभीर चुका अनावधानाने झाल्या असतील आसं कदापी वाटत नाही, हे सगळं लिखाण हे एका मानसिकतेतूनच व विकृतीमधून झालंय असंच समोर येतं.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आणि छत्रपती संभाजीराजे तसेच या राजघराण्यावर टीका करणारे सटरफटर टीकाकार उगवले आहेत त्यांनी इतिहास बारकाईने अभ्यासावा सवंग लोकप्रियतेसाठी काहीही लिहून मराठ्यांच्या तसेच छत्रपती शिवरायांच्या घराण्याविषयी चुकीचे लिहिले जर तर ते कदापी सहन केले जाणार नाही मराठ्यांची अस्मिता मराठ्यांचा स्वाभिमान म्हणजे शिवराय आणि त्यांचे घराणे आहे.

गिरीश कुबेर यांनी छत्रपती घराण्याची व संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी व त्याच बरोबर त्यांनी पुस्तकांचे वितरण त्वरित थांबवावे अशी आम्ही राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद च्या माध्यमातून मागणी करत आहोत.
महेश पाटील -बेनाडीकर
सभापती, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद ,नवी दिल्ली

महेश पाटील -बेनाडीकर पुढे म्हणाले की, दैनिक लोकसत्ता चा संपादक गिरीश कुबेर यांनी मराठ्यांचे दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी जे गलिच्छ लेखन करून त्यांच्या वर शिंतोडे उडवले आहेत. कुबेर यांनी इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. त्यांनी संभाजी राजे आणि सगळ्या मराठा समाजाचा अपमान केला असून राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदेच्या वतीने मी त्यांचा जाहिर निषेध करतो. आता त्यांनी संभाजी राजांच्या विषयी जे लिहिले आहे ते पुराव्यानिशी सिद्ध करावे तसेच मराठा समाजाची जाहिर माफी मागून ते पुस्तक परत घ्यावे अन्यथा मराठा समाज आणि राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद कुबेराला योग्य तो धडा शिकवल्या गप्प बसणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचे सभापती महेश पाटील यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles