पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल. pic.twitter.com/HDVdrPdxyu
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 3, 2021
पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
पण सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही. राज्यातील जे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय
कोव्हिड काळात ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरु होते. पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थी जे RTE अंतर्गत त्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तर 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.