Saturday, July 27, 2024

Breaking News| नाशिकमध्ये झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती, 22 जणांचा मृत्यू

- Advertisement -

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असतांना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅक मधून अचानक गळती झाली. यात २२ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक मधून गळती थांबविण्यात आली असून पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. या घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात १५० रुग्ण व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजन वर आहेत. त्यापैकी १३१ जण ऑक्सिजन आणि १५ जण व्हेंटीलेटर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेत २२ रुग्णांचा मूत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे सांगितले.
नाशिक शहरातील महत्वाचे समजले जाणारे झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेले आहे. ही घटना आज दुपारी घडली.

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाणार

नाशिकच्या दुर्घटनेत 11 महिला आणि 11 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद घटना आहे. स्थानिक आयुक्त यांच्याशी बोललो आहे. घटनास्थळी भेट देण्यासाठी जात आहे. ते कोविड सेंटर होते. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल,अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles