- Advertisement -
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.( MP Rajiv Satav dies in Corona)
खासदार राजीव सातव(MP Rajiv Sarva) यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. ( MP Rajiv Satav dies in Corona)
त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती.
"निशब्द.. आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे.अलविदा मेरे दोस्त" -नाना पटोले