1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार, केंद्र सरकारचा निर्णय
कोरोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस दिल्या जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.
यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लसीकरण गतिमान करण्याची गरज
कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेले आहे. त्यात त्यांनी कोरोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे.