Tuesday, November 12, 2024

बंटी पाटील यांनी शब्द मोडायला नको होता – आम. डॉ. विनय कोरे

- Advertisement -

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीचा प्रचार (Rajaram Election 2023) शिगेला पोहचला असताना आमदार विनय कोरे यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेची निवडणुक बिनविरोध करण्यात आमदार विनय कोरे यांचा सिंहाचा वाटा होता. “या निवडणुकीच्या वेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, उद्योगपती संजय पाटील यांनी आमदार विनय कोरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी कोरे यांच्या विनंतीस मान ठेवून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केली होती. परंतू दिलेला शब्द बंटी पाटील यांनी पाळला नाही त्यामुळे मी जाहीरपणे महाडिक गटाला पाठिंबा देत आहे.” असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार डॉ. विनय कोरे यांनी कुंभोजच्या सभेत केला. कोरे यांच्या पाठिंब्याने सत्ताधारी गट अधिक मजबूत झाला असून सत्ताधारी गटाचा विजय निश्चित मानला जात आहे.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, राजेंद्र पाटील, आदित्य पाटील, बाबासाहेब चौगुले आदी जिल्ह्यातील मात्तबर नेते मंडळी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles