केंद्र सरकारचा मोठा निर्णय |प्लाझ्मा थेरपीला कोरोना उपचारांमधून वगळण्यात आले आहे

Live Janmat

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रक्ताचा आणि प्लाझ्मा जाणवत असलेला तुटवडा यामुळे सामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. प्लाझ्मा मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची खूप धावपळ होत आहे. मागेल ती किमत देत आहेत. पण आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळून टाकलं आहे. आतापर्यंत करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळून टाकलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1394335020517494785?s=20

गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर करोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी करोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठीही आवाहन केलं जात होतं. मात्र अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचं समोर आलं आहे. गेल्या शुक्रवारी आयसीएमआर, टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याच्या बाजूने मत नोंदवलं होतं. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसंच काही संशोधकांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आलेले होतं.

भारतात प्लाझ्माचा अवैज्ञानिकपणे आणि अतार्किकपणे वापर केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या ताज्या संशोधनात आढळून आलेल्या पुराव्यानुसार प्लाझ्मा उपचार पद्धतीचा रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. तरीही रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचे प्लाझ्मा दात्यांचा शोध घेताना फरफट होत आहे असं या पत्रात म्हटलं होतं.

सध्या केल्या जात असलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे करोनाचा अति घातक विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. असा विषाणू निर्माण झाल्यास सध्याच्या महामारीच्या काळात तो पेट्रोल ओतण्यासारखाच ठरेल, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला होता.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com