Saturday, July 27, 2024

Corona update|रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. काही ठिकाणी तर किंमती वाढवून विकले जात आहेत. तसेच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली. या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत.

वाढते कोरोना रुग्ण आणि रेमडेसिवीरचा पुरवठा याचे प्रमाण रोजच्या रोज व्यस्त बनत चालले आहे. राज्यात कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे करोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे

https://twitter.com/drharshvardhan/status/1383394411166388232?s=19

नवीन कंपन्यांचे नवे दर खालीलप्रमाणे

  • कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड रेमडॅक इंजेक्शनचा दर २८०० रुपयांवरून ८९९ रुपये केला आहे.
  • सिजीन इंटरनॅशनल लिमिटेडनं रेमविन इंजेक्शनचा दर ३९५० रुपयांवरुन २४५० रुपये इतका केला आहे.
  • डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज लिमिटेडनं रेडिक्स इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून २७०० इतका केला आहे.
  • सिपला लिमिटेडनं सिप्रेमी इंजेक्शनचा दर ४००० रुपयांवरून ३००० रुपये इतका केला आहे.
  • मायलॅन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं डेसरेम या इंजेक्शनचा दर ४८०० रुपयांवरून ३४०० इतका केला आहे.
  • ज्युबिलँट जेनेरिक लिमिटेडनं जुबी-आर इंजेक्शनचा दर ४७०० रुपयांवरून ३४०० रुपये इतका केला आहे.
  • हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडनं कोविफोर या इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून ३४९० रुपये इतका केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles