मागच्या २४ तासात ५१ हजार ४५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांनी घरी सोडण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९१.०६ टक्के इतकं झालं आहे. तर एका दिवसात ३४ हजार ३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. (Corona Update | Decrease in corona patient number Recovery rate 91.06 percent)
सार्वजनिक आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोनामुळे (Corona) एका दिवसात ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.५४ टक्के इतका आहे. राज्यात ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ जणांचा कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. Corona Update | Decrease in corona patient number Recovery rate 91.06 percent