कोल्हापूर जिल्ह्यात उद्या दुपारपासून कडक लॉकडाऊन, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णय. (kolhapur corona lockdown Breaking News)

जिल्ह्यात वाढती (covid19) रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन (lockdown) पाळण्याचा निर्णय आज सकाळी 10 वा. झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते
जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी 10 वा. दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय
- पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
- Apara Ekadashi Vrat Katha 2025: यहां पढ़ें पूरी व्रत कथा, शुभ योग और पूजा विधि
- A Historic Collapse: How Aaron Nesmith and the Pacers Stunned the New York Knicks in Game 1
- 2025 Tata Altroz Launch: Bookings Open 2 June | Price Starts ₹6.89 Lakh
आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, लसीकरणासाठी येणारे नागरिकांना सूट देवून लॉकडाऊन कडकडीत करावा. (Breaking news kolhapur lockdown )
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,जिल्ह्यामध्ये सद्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा.ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीसांनी त्याची अंमलबजावणी करावी.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. (corona breaking)