महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन: येथे अर्ज करा.

महाराष्ट्रातील सर्व गरजू महिलांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महाराष्ट्र मोफत शिलाई मशीन योजना(Free Silai Machine Yoajana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना मोफत शिलाई मशिन योजना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. सर्व राज्यांमध्ये मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला महाराष्ट्र मोफत सिलाई मशीन योजनेचा लाभ मिळेल.

योजनेचे नाव Free Silai Machine Yojana Maharashtra
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण / शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफ़लाइन

Table of Contents

मोफत शिलाई मशीन योजना २०२२ काय आहे ?

राज्यातील गरीब कुटुंबांना महाराष्ट्र शासनाकडून मोफत शिलाई मशीन(Free Silai Machine Yoajana) देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ज्या महिलेला महाराष्ट्र मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या पात्र महिलेला योजनेसाठी फक्त फॉर्म भरावा लागेल आणि विहित तारखेपर्यंत अर्ज करावा लागेल. राज्यातील इच्छुक महिला या योजनेंतर्गत अर्ज प्राप्त करून इंटरनेटद्वारे देखील अर्ज करू शकतात. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम एक अर्ज घ्यावा लागेल, त्यानंतर हा अर्ज भरून तो संबंधित विभागाकडे जमा करावा लागेल. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

महाराष्ट्र शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट

  • महिलांसाठी अधिक स्वातंत्र्य निर्माण करणे आहे.
  • या योजनेअंतर्गत गरीब महिला उत्पन्न मिळवू शकतील.
  • महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
  • कुशल महिला त्यांच्या कौशल्याचा वापर करू शकतील.
  • या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास मिळेल.
  • महिलांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेता येईल.

आवश्यक बाबी – महाराष्ट्र मोफत शिलाई मशीन योजना

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
  • केवळ २०ते ४० वयोगटातील महाराष्ट्रातील महिलाच यासाठी पात्र मानल्या जातील.
  • महाराष्ट्र मोफत शिलाई मशिन योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांनाच दिला जाणार आहे.
  • महिलांचे कौटुंबिक उत्पन्न दरमहा १२,००० रुपयांपेक्षा कमी आहे फक्त ती महिला या योजनेसाठी पात्र आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • महिला आधार कार्ड
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
  • विधवा पुरावा (जर स्त्री विधवा असेल)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • शिवणकाम कौशल्य पुरावा
  • वय प्रमाणपत्र

अधिक महितीसाठी या शासकीय वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा.

(Free Silai Machine Yoajana)या व अशा विविध योजनाची माहिती live जनमत या आपल्या पोर्टलवर शासकिय योजना या पेज वर पाहायला मिळतील. त्यासाठी येथे क्लिक करा.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com