राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांबाबत उद्भवलेल्या विविध प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक तसेच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरू केले. ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील’ असा ठाम इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. mpsc andolan pune
Table of Contents
Toggleस्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत — राज्यसेवा मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकलावी, तसेच कंबाईन परीक्षा २०२४ अंतर्गत PSI, STI, ASO या पदांसाठीच्या जागा वाढवाव्यात. परिणामी, स्पर्धा परीक्षेतील कटऑफच्या मर्यादा ओलांडूनही अनेक पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार जागा न मिळाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. mpsc andolan pune
अलीकडे जाहीर झालेल्या राज्यसेवा २०२४ परीक्षेच्या निकालात मराठा विद्यार्थ्यांना EWS प्रवर्गात न समाविष्ट केल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गात’ असतानाही यादीत समावेश न झाल्याने EWS गोंधळास कारणीभूत ठरला आहे.
Also read :
Illegal MPSC Coaching Classes in Pune Under Police Radar: Commissioner Warns of Strict Action
MPSC Group C Hall Ticket 2025 : Download Link, Date Details
Ullu Web Series Ankhiyon Se Goli Maare Part 2: Nayi Kahani, Free Mein Dekhein!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट
या आंदोलनामुळे प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सरकारला अल्टिमेटम देत स्पष्ट सांगितले आहे की, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. सरकार आणि आयोगाने विद्यार्थ्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. mpsc andolan pune
“आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे. १. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024: – 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. – आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात. – आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा अभ्यासासाठी कालावधी द्यावा. – ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक व अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने न्याय्यपणे घ्यावी. २. संयुक्त महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024: – PSI, STI, ASO, SR या पदांच्या जास्तीत जास्त रिक्त जागांची माहिती संबंधित विभागांनी आयोगाला अतिरिक्त मागणी पत्रकाद्वारे पाठवावी. – आयोगाने या जागा वाढवून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे दोन्ही प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आयोग व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल.” अशी प्रतिक्रियाआप चे नेते धनंजय शिंदे यांनी ट्विट करून दिली.
आज राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे पुढील २ प्रमुख मागाण्यांसाठी आंदोलन होत आहे.
— Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@Dhananjay_2025) April 16, 2025
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024:
– 318 विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.
– आरक्षण व इतर तांत्रिक बाबी तातडीने सोडवाव्यात.
– आयोगाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर झाल्यानंतर किमान 45 दिवसांचा… pic.twitter.com/YapT1EyQFH
🌟 Top 10+ Ullu Web Series You Can Watch Online Free