स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरू होते, ज्यांच्यावर लाखो भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
यंदा ३१ मार्च २०२५ म्हणजेच सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६९ वा प्रकट दिन सोहळा पार पडणार आहे. हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे.
स्वामी समर्थ महाराज यांच्या शिकवणी आणि आशीर्वादाने भक्तांना नवी प्रेरणा मिळते. त्यांच्या वचनांनी भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. तुमच्या प्रियजनांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा आणि हा पवित्र दिवस भक्तीमय वातावरणात साजरा करा.
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा २०२५
“अशक्य ही शक्य करतील स्वामी!”
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,
तुमच्या शब्दांनी हृदय स्फूर्तीत नाहते!
श्रद्धा-सबुरीचा मार्ग दाखविता,
जीवन प्रकाशमय तुम्ही करता!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा
स्वामी समर्थांची कृपा राहो,
जीवनात सुख-समाधान लाभो!
नित्य त्यांच्या नामस्मरणाने,
संकटांचे सावटही निघून जाओ!!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वामी समर्थांची कृपा जिथे असते
तिथे संकटेही दूर पळतात.
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वामी समर्थांचा मंत्र जपला की,
आयुष्य सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जातं.
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“स्वामी समर्थ!” 🙏