10वी च्या परीक्षेबाबत आज अंतिम निर्णय?| SSC Board Exam

- Advertisement -

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणं अशैक्षणिक असल्याची भूमिका घेत धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीएसई, एसएससी आणि आयसीएई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.(Final decision regarding 10th exam) today? | SSC Board Exam

मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी बुधवारी (19 मे) संध्याकाळी सुनावणी पार पडली. तिन्ही बोर्डांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगत गुरुवारपर्यंतची वेळ दिली. याचिकाकर्ते धनजंय कुलकर्णी यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “16 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी महाधिवक्ता का हजर नाहीत? असा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. हा विषय गंभीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. सुनावणी आता गुरुवारी होणार आहे.”

गुरुवारी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड, राज्य सरकार आणि पालक संघटना आपली भूमिका कोर्टासमोर मांडतील. दहावीची परीक्षा रद्द करणे हा निर्णय चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसंच तिन्ही बोर्डाची निकाल जाहीर करण्याची पद्धत आणि सूत्र वेगवेगळे असल्याने भविष्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच परीक्षेशिवाय निकाल देणे अनैतिक आहे. अशी भूमिका याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी मांडली आहे.

पहिल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तिन्ही बोर्ड आणि महाराष्ट्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण एसएससी बोर्डाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. तेव्हा राज्य सरकार कोर्टात दहावीचा निकाल कशाच्या आधारे जाहीर होईल याची माहिती देण्याची शक्यता आहे. (Final decision regarding 10th exam today? | SSC Board Exam)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles